Prism Foundation`s Phoenix School Organized Lt. Padmaja Godbole Interschool Poem Recitation Competition

प्रिझम फाऊंडेशन ( विशेष शिक्षण )

कै. पद्मजा गोडबोले आंतरशालेय कविता पाठांतर स्पर्धा 2026 – 2027

            मंगळवार दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी प्रिझम फाऊंडेशन मध्ये कै. पद्मजा गोडबोले आंतरशालेय कविता पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

            सध्या विद्यार्थ्यांमध्ये एकंदरीत पाठांतराचा अभाव दिसतो. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे,

कवितांची आवड निर्माण व्हावी, स्पष्ट उच्चार व्हावेत, अध्ययन अक्षमता असलेले विद्यार्थी सुद्धा यामध्ये कमी नाहीत हे सर्वांच्या लक्षात आणून दयावे, हा या स्पर्धे मागील हेतु होता.

            बाहेरील  11  शाळेतील एकूण 77  विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.  स्पर्धेच्या परीक्षक व पाहुण्या म्हणून नाट्य सिने अभिनेत्री व कवियत्री मधुराणी गोखले या उपस्थित होत्या.

            पाहुण्या स्वतः कवियत्री असल्याने  कविता सादर कशी करावी याचे बारकावे सांगून सर्व विद्यार्थींचे  कौतुक आपल्या मनोगतातून  केले.

            सर्व विजेत्या विद्यार्थ्याना पाहुण्यांच्या  हस्ते ट्रॉफी व प्रशस्तिपत्रक देण्यात आले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्याना प्रशस्तिपत्रक देण्यात आले.  

            स्पर्धेचे आयोजन व नियोजन प्रिझम फाऊंडेशन संचलित फिनिक्स शाळेच्या  मुख्याध्यापिका  व शिक्षकांनी केले होते.

प्रिझम फाऊंडेशनचे  विश्वस्त, संचालिका व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सहभागी शाळांचे शिक्षक व पालक पण उपस्थित होते.