Prism Exhibition

प्रिझम फौंडेशन ( विशेष शिक्षण)

प्रिझम फाऊंडेशन ( विशेष शिक्षण ) मध्ये ‘रंग मराठी साहित्या’चे या विषयावर आधारित प्रदर्शन मंगळवार दि. 03 व बुधवार दि. 04 फेब्रुवारी 2026 रोजी भरविण्यात आली होते. यामध्ये मराठी भाषेचा इतिहास, साहित्याचे प्रकार, शिलालेख, काळाचे प्रकार, वैशिष्ट्ये पुरस्कार, उपयोजित लेखन यांचे माहिती चार्ट, प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. वेगवेगळ्या बुकमार्कच्या आकारावर सुविचार व इंग्रजी शब्दांचे मराठी अनुकरण लावण्यात आले होते. व्याकरणावर आधारित खेळ मांडण्यात आले होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीमती रेखा साने इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. बाहेरील शाळेतील 300 विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली. या निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बाहेरील शाळेतील 51 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निबंध स्पर्धेचे निरीक्षण मा. पूनम छत्रे व मा. स्नेहल देशमुख यांनी केले . विजेत्या विद्यार्थ्यांना माननीय श्री ल. म कडू यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

दोन्ही दिवस वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद प्रदर्शनाला भेट देणाऱ्या व्यक्तींनी घेतला. त्याचबरोबर आलेल्या प्रेक्षकांना वस्तू खरेदीसाठी स्टॉल ही होते . संपूर्ण प्रदर्शनासाठी नजरेला आकर्षित करणारी सजावट आणि पुस्तकांच्या प्रतिकृती ‘सेल्फी पॉईंट’ म्हणून होते . प्रिझम फाउंडेशन संचलित फिनिक्स, लार्क, माधवी ओगले व्यावसायिक शाळा व बेन्यू प्रशिक्षण केंद्र अशा चारही विभागांचे सर्व विद्यार्थी, विश्वस्त शिक्षक व स्टाफ, पालकांच्या मदतीने हे प्रदर्शन साकार झाले.

Get Free Consultations

SPECIAL ADVISORS
Quis autem vel eum iure repreh ende