Prism Foundation – Foundation Day 2025
प्रिझम फौंडेशन संस्थापन दिन
रविवार दि. 01 जून 2025 रोजी प्रिझम फौंडेशन चा 36 वा संस्थापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने निर्माण पुणे आयोजित रविंद्र देशपांडे व त्यांच्या साथीदारांनी ‘कविता जीवनसाथी’ हा बहारदार कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम ऐकताना सर्वांना गावाकडचे वातावरण, शाळा, वाडा याची सफर घडली. तसेच जुन्या कविता, गाणी व श्लोक ऐकण्यास मिळाले.
या कार्यक्रमास विश्वस्त सर्व मुख्याध्यापिका, शिक्षक, कर्मचारी, सेवक सेविका उपस्थित होते. तसेच प्रिझमचे सभासद, हितचिंतक, देणगीदार, पालक व रिक्षा काका यांनी ही उपस्थित राहून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










