LARC & MOVS – Guru Pornima
प्रिझम फाऊंडेशन संचलित लार्क माधवी ओगले व्यावसायिक शाळा गुरुपौर्णिमा
गुरुवार दि. 10/07/2025 रोजी दोन्ही शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका स्वाती सगम यांनी प्रतिमा पूजन करून गुरुपौर्णिमेचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. गुरुपौर्णिमेनिमित्त लार्क शाळेत प्रत्येक वर्गात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी ‘माझी आवडती भाजी’, ‘माझा आवडता प्राणी’ व ‘माझी आवडती व्यक्ती’ हे विषय देण्यात आले होते.
एम. ओ. व्ही. एस शाळेत विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी ‘माझा आवडता छंद’ हा विषय देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी गाणे, नृत्य, बोटिंग, सायकल चालविणे, बागकाम करणे असे स्व-छंद सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.



Recent Posts
17 Jul 26
Phoenix School – Election 2026-2027
22 Jun 26
LARC & MOVS – Yoga Day
09 Jun 26
