Phoenix School – Election 2026-2027
प्रिझम फाऊंडेशन संचलित फिनिक्स स्कूल
शालेय निवडणूक 2026 – 2027
फिनिक्स शाळेत शुक्रवार दि. 17.07.2026 रोजी वार्षिक शालेय निवडणूक घेण्यात आली. Head Girl, Head Boy, Clenliness in-charge, Functions & Festival in -charge, Assembly in-charge अशा विविध पदांसाठी विद्यार्थांना उमेदवारी दिली होती. विद्यार्थांना सर्व पदांसाठीची कामे समजावून सांगण्यात आली. विद्यार्थ्याना लोकशाहीचे धडे शाळे पासून मिळावे आणि त्यांना शाळेत नेतृत्व करण्याची संधी मिळावी या उद्देशाने या निवडणूका घेण्यात आल्या होत्या.
संस्थेच्या संचालिका, तिन्ही शाळाच्या मुख्याधपिका, ऑफिस कर्मचारी, शिक्षक, मावशी, विद्यार्थी सर्वानी अतिशय उत्साहात मतदान केले. सर्व विद्यार्थी, पदाधिकारी, शिक्षक मिळून 100% मतदान झाले.
अशा प्रकारे अतिशय उत्साहात मतदान पार पडले.






