पालखी सोहळा
गुरुवार दि. ०९.०७.२०२६ रोजी प्रिझंम फाऊंडेशन मध्ये पालखी सोहोळा भक्तीमय वातावरणात अतिशय उत्साहाने साजरा करण्यात झाला. सर्वानी गजर करून शाळेतील विद्यार्थी वारकारींनी पालखीसह प्रस्थान केले. विठ्ठल नामाच्या गजरात सर्वजण रंगून गेले होते. पालखीची स्थापना झाल्यावर संचालिका व मुख्याध्यापिकानी पूजा करून आरती केली.
फिनिक्स शाळेतील विद्यार्थ्यानी पालखीची माहिती, अभंग व नृत्य , लार्क शाळेतील विद्यार्थ्यानी पारंपरिक वाद्यांची माहिती, वारकरी नृत्य तर एम. ओ. व्ही. एस. मधील विद्यार्थ्यानी अभंग व अन्न वाया घालू नये, खेळणी व कपडे अनाथ आश्रमाना दान करा, गरजववंताना दान करा ही संदेशपर नृत्य सादर केले. सेविकानी उत्स्फूर्तपने अभंग सादर केला.
पारंपरिक रिंगण, फुगडी खेळून प्रसाद वाटपाने पालखी सोहळा संपन्न झाला.









Recent Posts
17 Jul 26
Phoenix School – Election 2026-2027
22 Jun 26
LARC & MOVS – Yoga Day
09 Jun 26
