Late Padmaja Godbole Inter School Kavita Pathantar Spardha

प्रिझम फौंडेशन (विशेष शिक्षण)

सोमवार दि. 23/09/2024 रोजी प्रिझम फौंडेशन मध्ये कै. पद्मजा गोडबोले आंतरशालेय कविता पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . बाहेरील सात शाळेतील 48 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षक व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धीरज मडके हे उपस्थित होते . त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रोत्साहनपर मत व्यक्त केले. नुसते पाठांतर नसून अर्थ समजून कविता म्हणण्यावर जास्त भर द्यावा.परीक्षकांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली व त्यांचे कौतुक करण्यात आले.