प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
शाळेत दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. मोठ्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी सजवून बांधली होती . छोट्या वर्गातील विद्यार्थ्यांनी राधा कृष्णाचा वेश परिधान करून अतिशय उत्साहात हंडी फोडली. शिक्षकांनी दहीहंडीच्या प्रसादाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेऊन सर्वांना प्रसाद दिला. प्रसाद स्वतःला बनविण्यास मिळाल्याने विद्यार्थी खुष होते.