प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
गुरुवार दि. 16.08.2024 रोजी दोन्ही शाळेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. त्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक व पाहुणे म्हणून श्री. पार्थ तरडे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे छान संवाद साधून चित्रकले बद्दल माहिती सांगितली व अंकातून चित्र काढून दाखविली. विद्यार्थ्यांनी नारळी पौर्णिमेच्या गाण्यावर नृत्य सादर केले. मुलींनी मुलांना राखी बांधून औक्षण केले व कार्यक्रमाची सांगता झाली.