प्रिझम फौंडेशन संचालित फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे पुणे पुस्तक महोत्सव येत्या 13 ते 21 डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केला आहे. या अनुषंगाने 'शांतता .... पुणेकर वाचत आहेत' हा उपक्रम होत आहे. वाचन संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने चालविलेला हा उपक्रम आजच्या पिढीला अतिशय प्रेरणादायी आहे. प्रिझम फौंडेशन ( विशेष शिक्षण) पुणे, मधील संचालिका, मुख्याध्यापिका,, तिन्ही शाळेतील, विद्यार्थी, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी व सेवक वर्गाने वाचन केले आणि 'शांतता .... पुणेकर वाचत आहेत' या उपक्रमात सहभाग नोंदविला व सर्व छायाचित्र अपलोड करण्यात आले आहे.
