प्रिझम फौंडेशन (विशेष शिक्षण)
मंगळवार दि . 16/09/2025 रोजी फाउंडेशन मध्ये कै. पद्मजा गोडबोले आंतरशालेय कविता पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण 16 शाळा सहभागी झाल्या होत्या.ही स्पर्धा एकूण पाच गटात घेण्यात आली. या स्पर्धेचे पाहुणे व परीक्षक म्हणून माननीय श्री. जय निकंबे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा वेल्हे यांनी काम पाहिले. स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांनी छान सादरीकरण केले. परीक्षकांनी अत्यंत निरपक्षतेने परीक्षण केले. विजेता विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडेल व उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी मुलांचे कौतुक केले. सहभागी शाळेतील काही शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेत संस्थेच्या संचालिका, तिन्ही शाळांच्या मुख्याध्यापिका सहभागी होत्या. या स्पर्धेचे आयोजन व नियोजन लार्क व एम.ओ.व्ही.एस शाळेने केले.