Prism Foundation Ganpati Festival

गुरुवार दि. २८/०८/२०२५ रोजी प्रिझम फाऊंडेशन मध्ये गणेश स्थापना करण्यात आली. यावर्षी ‘जागतिक वारसा स्थळ’ मानांकनात निवड झालेले १२ किल्ले या विषयावर गणपती सभोवती व हॉल मध्ये सजावट करण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने रायगड किल्ल्याची प्रतिकृति ( मॉडेल ) करून किल्ल्यामध्ये गणपती बसविला. तसेच विद्यार्थ्यांनी इतर किल्ल्यांचे चार्ट व चित्रे करून आणली होती. शाळेचा विद्यार्थी शौर्य मुरकुंबी व मान्यवरांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली.