Phoenix School Marathi Elocution

दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी फिनिक्स शाळेत मराठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये यावर्षी वैयक्तिक कविता पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी कविता चालीत पाठ कराव्या, उच्चार स्पष्ट व्हावे, आत्मविश्वास वाढवा. या उद्देशाने स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेतील एकूण १६ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी लेव्हल प्रमाणे 4 गट करण्यात आले होते. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून मा. रेणुका महाजन यांना आमंत्रित करण्यात आले होते. परीक्षकांनी ग. दि. माडगूळकर यांची ‘कोंबडीच्या पिला’ ही कविता सादर करून सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका केतकी कुलकर्णी मॅडम व विद्या भागवत मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे निवेदन शिल्पा कोल्हटकर यांनी केले व उषा अंभोरे यांनी आभार व्यक्त केले. शाळेचे सर्व शिक्षक, मावशी, मामा व ऑफिस स्टाफ यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम छान यशस्वी झाला.