Phoenix School Guru Purnima

गुरुवार दि. 10/07/2025 रोजी गु गुरुपौर्णिमेनिमित्त ‘गुरुशिष्य नाते’ हा कार्यक्रम संप्पन झाला. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने गायन, वादन, नृत्य तसेच नाटिका या मध्ये भाग घेतला.

संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन पोस्ते सरांनी केले. विद्यार्थ्यांनी फलक लेखन केले. समूह गीते, प्रार्थना, गुरु शिष्य जोड्या , छोट्या नाटिकांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी पाठांतर करून सादर केले.

बेन्यू मुख्याध्यापिका विद्या भागवत व शाळेच्या मुख्याध्यापिका केतकी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा विषयावर आधारित गोष्टी सांगितल्या. सर्व शिक्षक, मावशी, मामा यांनी कार्यक्रमासाठी पूर्ण सहकार्य केले. शिल्पा मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी तयारी साठी पूर्ण सहकार्य केले. त्यामुळे सगळ्यांच्या एकत्रित काम करण्याने कार्यक्रम छान झाला.