दिनांक 23/06/2025 रोजी लार्क व एम.ओ.व्ही.एस शाळेत योग दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार सूर्यनमस्कार, काही आसने व योगासनाला अनुसरून पूरक शारीरिक हालचाली करून व्यायाम केला. दोन्ही शाळेतील शिक्षक वृंदानेही हे टाळी योगाचे सादरीकरण केले.
सूर्यनमस्कार व विविध आसने करताना विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. योग केल्याने होणारे शारीरिक व मानसिक फायदे विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व बेन्यू प्रशिक्षण केंद्राच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या.