प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
लोकमान्य टिळक पुण्यतिथि पाढे पाठांतर स्पर्धा व वादविवाद स्पर्धा
शुक्रवार दि. 01 ऑगस्ट 2025 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथि निमित्त पाढे पाठांतर, अंक मोजणी / ओळख स्पर्धा घेण्यात आली. एम. ओ. व्ही. एस शाळेतील काही विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी क्षमतेनुसार अंक मोजणी व पाढे पाठांतर सादर केले. विद्यार्थ्यांना वादविवाद स्पर्धा साठी व्यायाम करणे व न करणे, ऑनलाइन व ऑफलाइन खरेदी, कापडी पिशवी व प्लॅस्टिक पिशवी हे विषय देण्यात आले होते. दोन्ही स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फुतेने मोठ्या संख्येनी सहभाग घेतला.