प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स, लार्क व माधवी ओगले व्यावसायिक शाळा ( MOVS )
वार्षिक स्नेहसंमेलन
प्रिझम फाऊंडेशन संचलित फिनिक्स, लार्क व माधवी ओगले व्यावसायिक शाळेचे ( MOVS ) वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ रोजी एकत्रित साजरे करण्यात आले.
यावर्षीचे स्नेहसंमेलन संस्कार, नव्या जुन्या विचांरांची ‘गुंफण’ या विषयावर आधारीत सादर झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कला नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ श्री. श्रीराम रानडे व त्याच्या पत्नी सैा . संजीवनी रानडे या उपस्थित होत्या .
कार्यक्रमात तिन्ही शाळेमधील विशेष शिक्षण घेणाऱ्या ९० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गायन, समुहगायन, वादन, नृत्य, नाटके, वक्तृत्व असे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.
संचालिका हर्षा मुळे यांनी पालक, विद्यार्थी व उपस्थितांशी प्रेरणात्मक काव्यातून संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री व सौ रानडे यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक, संचालक व संस्थेचे कौतुक व शुभेच्छा त्यांच्या प्रोत्साहनात्मक भाषणातून दिल्या . प्रमुख पाहुणे, संचालिका व मुख्याध्यापिकांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
