LARC Environment Day

प्रिझम फौंडेशन संचालित, लार्क ( संमिश्र अपंगत्व )

पर्यावरण दिन

गुरुवार दि. ६ जून २०१९ रोजी शाळेत पर्यावरण दिन अतिशय उत्साहात आनंदात साजरा केला गेला. विद्यार्थ्यांनी पर्यावरणाविषयी भित्ती पत्रके तयार करून पर्यावरण संरक्षणाविषयी माहिती दिली. तसेच शाळेत आणि आजूबाजूच्या परिसरात पर्यावरण जागृतीसाठी वृक्ष दिंडीचे आयोजन केले होते. प्रिझम फौंडेशनच्या संचालिका सौ. हर्ष मुळे, लार्क शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती सगम आणि शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थित वृक्षारोपण केले.